Thursday, November 5, 2020

मित्रों टीव्हीने ‘मेड इन इंडिया’ अॅप्सवर प्रकाश टाकण्यासाठी लाँच केले आत्मनिर्भर अॅप्स(Atmanirbhar Apps)

भारतीय अॅप्सना एकत्र आणून सलाम करणारा अशा प्रकारचा एकमेव शोध प्लॅटफॉर्म



भारतातील डेव्हलपर्स आणि सुक्ष्म उद्योजकांना ग्राहकांच्या नजरेत येण्याची उत्तम संधी देणारा अनोखा उपक्रम


 


राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून मित्रों टीव्हीने #AtmanirbharPledge अभियानाचाही शुभारंभ केला


 


ऑक्टोबर २०२०: पंतप्रधान मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाला प्रमोट करण्यासाठी भारतातील शॉर्ट-व्हिडिओ अॅप मित्रों टीव्हीने आज राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून अशा प्रकारचा एकमेव शोध प्लॅटफॉर्म ‘आत्मनिर्भर अॅप्स’ (Atmanirbhar Apps) या नावाने आणला आहे. आत्मनिर्भर अॅपच्या माध्यमातून मित्रों टीव्हीला लोकांना स्थानिक बाबींना प्राधान्य देण्याचे अर्थात ‘व्होकल फॉर लोकल’चे आवाहन करायचे आहे आणि विविध भौगोलिक प्रदेशांतील भारतीय अॅप्सवर प्रकाश टाकायचा आहे.


 


फाउंडर्स व्हिडिओची लिंक - https://twitter.com/Mitron_Tv/status/1322421536351907840?s=20


 


राष्ट्रीय एकता दिवस हा ‘भारताचे लोहपुरुष’ म्हणून ओळखल्या जाणा-या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. सर्व संस्थाने एकत्र आणून भारत एक करण्यामध्ये पटेल यांची भूमिका महत्त्वाची होती. मित्रों टीव्हीचे आत्मनिर्भर अॅप हे लोहपुरुषाला व भारतीय डेव्हलपर्सच्या प्रयत्नांना केलेले वंदन आहे. वापरकर्त्यांना त्यांच्या विविध गरजांच्या पूर्ततेसाठी भारतीय अॅप्स सहज ओळखता येण्याजोगी करून एतद्देशीय तंत्रज्ञानाचा आवाका वाढवण्याचा तसेच ते मजबूत करण्याचा उद्देश या अॅपमागे आहे. सध्या या प्लॅटफॉर्मवर १००हून अधिक अॅप्स आहेत आणि या वर्षाच्या अखेरीपर्यंत ही संख्या ५०० अॅप्सपर्यंत नेण्याची योजना आहे. ई-प्रशासन, युटिलिटी, कृषी, गेमिंग, मनोरंजन, जीवनशैली, ई-अध्ययन यांसारख्या विविध वर्गांतील अॅप्सची मालिका या प्लॅटफॉर्मवर आहे. काही उदाहरणे नावानिशी द्यायची तर कैफायत, ग्रोसिट, जैन ठेला, होम शॉपी, मेकमायट्रिप, लुडो किंग, योरकोट, वृधी स्टोअर्स, एक्सप्लोरी एआय कीबोर्ड, एमपरिवर्तन आणि असे अनेक अॅप्स आत्मनिर्भर अॅप्सवर आहेत. आत्मनिर्भर अॅप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध करून घेण्यासाठी क्लिक करा - http://bit.ly/AtmaNirbhar


 


मित्रोंचे सह-संस्थापक व सीईओ शिवांक अगरवाल आत्मनिर्भर अॅप्सच्या शुभारंभाबद्दल म्हणाले, “राष्ट्रीय एकता दिवशी भारतीय वापरकर्त्यांसाठी आत्मनिर्भर अॅप्स आणताना मला खूप अभिमान आणि आनंद वाटत आहे. पंतप्रधान मोदी यांनी मे महिन्यात आत्मनिर्भर होण्यासाठी व मेड इन इंडिया परिसंस्था निर्माण करण्यासाठी रणशिंग फुकल्यानंतर, उत्तम भारतीय अॅप्स वापरकर्त्यांच्या नजरेत आणून देणे खूपच महत्त्वाचे आहे, असे आम्हाला वाटले. हे अॅप्स भारतातील व्यवहार सुरू ठेवण्यामध्ये लक्षणीय भूमिका बजावत आहेत. मित्रों टीव्हीचा हा स्वयंपूर्णता साजरी करण्याचा व देशांतर्गत व्यवसायांना प्रोत्साहन देण्याचा छोटासा प्रयत्न आहे.”


 


मित्रोंचे सह- स्थापक आणि सीटीओ अनिश खंडेलवाल म्हणाले, “मित्रों टीव्हीचे आणखी एक उत्पादन देताना मला प्रचंड आनंद झालेला आहे. आम्ही मित्रों टीव्ही सुरू केला तेव्हा वापरकर्ते आम्हाला एवढा प्रतिसाद देतील अशी कल्पनाही केली नव्हती. सहा महिन्यांच्या आत मित्रों टीव्हीने ३९ दशलक्ष डाउनलोड्सचा टप्पा पार केला आहे. भारतीयांचा स्थानिक अॅप्सवर विश्वास आहे या आमच्या विचाराला यामुळे पुष्टी मिळाली आणि त्यातूनच आम्ही आत्मनिर्भर अॅप्स सुरू केले आहे. आम्ही भारतीय वापरकर्त्यांना आमच्या शोध प्लॅटफॉर्मवर येण्याचे निमंत्रण देत आहोत. येथे त्यांना त्यांच्या सर्व गरजांना अनुकूल असे सर्वोत्तम देशी अॅप्स सापडतील.’’


 


हे अॅप लाँच करून मित्रों टीव्हीने #AtmanirbharPledge अभियानालाही सुरुवात केली आहे. #VocalForLocal धोरणाला पाठिंबा म्हणून हे अभियान सुरू करण्यात आले आहे. हे अभियान भारतीयांना अॅप्सच्या विश्वातील देशांतर्गत पर्याय निवडण्याचे आवाहन करते आणि त्यांच्या आत्मनिर्भर भारताप्रती असलेल्या पाठिंब्याला एक दिशा देते.


 


आपण सर्वांनी एकत्र येऊन #MainHoonAtmanirbhar अशी प्रतिज्ञा करू आणि भारताला तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून विकसित करू, अ‍ॅक्सेससाठी येथे क्लिक करा- http://bit.ly/AtmaNirbhar


 


 


 


मित्रों टीव्हीची अधिकृत हॅण्डल्स: आत्मनिर्भर अॅप्सची अधिकृत हॅण्डल्स:


 


ट्विटर: @Mitron_Tv ट्विटर: @AtmanirbharApps


 


इन्स्टाग्राम: mitrontvapp इन्स्टाग्राम: atmanirbharapps


 


फेसबुक: @mitrontvapp फेसबुक: @AtmanirbharAppsByMitron


 


मित्रों टीव्ही विषयी:


 


एप्रिल २०२० मध्ये लाँच झालेले मित्रों हे एक शॉर्ट-फॉरमॅट व्हिडिओ अॅप आहे. ते वापरकर्त्यांना एक मिनिट कालावधीचे व्हिडिओ निर्माण करण्याची, अपलोड करण्याची, बघण्याची व शेअर करण्याची मुभा देते. शिवांक अगरवाल आणि अनिश खंडेलवाल या तरुण उद्योजकांनी स्थापन केलेल्या या ‘मेड इन इंडिया’ अॅपचे उद्दिष्ट विविध वर्गांतील स्थानिक प्रतिभेला सहाय्य करणे व सर्वांसमोर आणणे हे आहे. त्याचप्रमाणे भारतातील स्मार्टफोन वापरकर्त्यांना शॉर्ट-फॉर्म मनोरंजन पुरवणे हाही यामागील उद्देश आहे.


 


अलीकडेच मित्रोंने निधी उभारणी फेरीत ५ दशलक्ष डॉलर्सचा निधी उभा केला. या फेरीचे नेतृत्व नेक्सस व्हेंचर पार्टनर्स, 3वन4 कॅपिटल आणि अन्य एंजल गुंतवणूकदारांनी केले. एंजल गुंतवणूकदारांमध्ये दीप कालरा (मेकमायट्रिप), अमरीश राऊ (पाइन लॅब्ज), जितेंद्र गुप्ता (ज्युपिटर मनी) आणि अन्य काहींचा समावेश होता.


एसीसी की निर्माण सलाहकार पहल के जरिये हजारों राजमिस्त्रियों, ठेकेदारों और घर बनाने वालों को प्रदान की गई तकनीकी सहायता

 एसीसी ने अपनी निर्माण सलाहकार पहल के तहत घर बनाने वालों, राजमिस्त्रियों और ठेकेदारों को सशक्त बनाने की दिशा में उठाया एक महत्वपूर्ण कदम • ए...